मुखपृष्ठ परिचय प्रोग्राम्स ऑर्डर नोंदवा प्रश्नोत्तरे संवाद संपर्क
स्वयम् लर्निंग सॉफ्टवेअर सोल्युशन्स अर्थात 'स्वयम् लर्न' मध्ये आपले स्वागत आहे!

डिजीटल माध्यमांच्या आजच्या युगात ग्राफिक्स आणि डिझायनिंगला खूप महत्वाचे स्थान आहे. दृष्य माध्यमांशी संबंध असणा-या प्रत्येकाला कोणते ना कोणते डिझायनिंग सॉफ्टवेअर शिकावेच लागते. त्यासाठी हजारो रुपये आणि काही महिन्यांचा अमूल्य वेळ खर्च करावा लागतो, प्रसंगी दैनंदिन वेळापत्रकही त्यासाठी बदलणे भाग पडते. सॉफ्टवेअर शिकण्याची ही प्रक्रिया सुलभ, आनंददायी, वेळेची आणि पैशाची बचत करणारी हवी या भूमिकेतून 'स्वयम् लर्न' ने जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ग्राफिक्स आणि डिझायनिंग सॉफ्टवेअर्स चे सेल्फ लर्निंग प्रोग्राम्स विकसित केले आहेत.

कोणत्याही सॉफ्टवेअर मधील नैपुण्य हे भाषातीत असल्याने त्याचे शिक्षण मायबोली मधूनच दिले जावे या उद्देशाने 'स्वयम् लर्न' प्रोग्राम्स मराठी मध्ये आहेत. समाजातील कोणताही घटक वेळेच्या आणि पैशाच्या अभावी ग्राफिक्स डिझायनिंग सॉफ्टवेअरच्या शिक्षणापासून, ज्ञानापासून आणि करियरच्या संधींपासून वंचित राहू नये ही भूमिका या मागे आहे. 'स्वयम् लर्न' च्या माध्यमातून तंत्रज्ञानाचे, कौशल्याचे आणि आत्मविश्वासाचे तेज असलेली पिढी तयार व्हावी ही प्रेरणा 'स्वयम् लर्न' प्रोग्राम्स विकसित करण्यामागे आहे.
स्वयम् लर्न संवाद स्वयम् लर्न संवाद
कॉपीराईट 2013, स्वयम् लर्निंग सॉफ्टवेअर सोल्युशन्स, पुणे.

www.swayamlearn.com