free website software

स्वयम् लर्न..
आत्मविश्वास ज्ञानाचा, पासवर्ड यशाचा !

वापरण्यास सहजसोपी आणि सुविधांनी युक्त ही आजच्या ग्राफिक डिझाईनिंग सॉफ्टवेअर्सची वैशिष्ट्ये आहेत. परंतु त्यांमध्ये कुशलतेने व्यावसायिक दर्जाचे काम करण्यासाठी आवश्यकता असते ती विशेष प्रशिक्षणाची, जे तुमच्या रचनात्मक विचारांना आणि कल्पकतेला मूर्त रूप देईल. असे प्रशिक्षण अनुभवी प्रोफेशनल्सच उत्तम प्रकारे देऊ शकतात.
स्वयम् लर्न ट्रेनिंग प्रोग्राम्स याची संपूर्ण पूर्तता करतात.

परिपूर्ण, प्रोफेशनल लर्निंग प्रोग्राम्स

यशस्वी करिअर साठी.. सर्वांसाठी

दर्जेदार प्रशिक्षण   

...

इंडस्ट्री प्रोफेशनल्स व्दारा विकसित सेल्फ लर्निंग प्रोग्राम्स

घर बसल्या बेसिक से ऍडव्हान्स लेवलचे ट्रेनिंग प्रोग्राम्स

सुलभ मराठी भाषा, सुस्पष्ट हाय डेफिनेशन व्हिडीओ 

वापरण्यास सुलभ

...

पाहा आणि शिका! लिहिणे वाचणे नाहीच एक्सरसाइज़ फाइल्सचा समावेश,

प्रोग्राम वापरण्यासाठी इंटरनेट आवश्यक नाही.

वेळेचे बंधन नाही. आपल्या उपलब्ध वेळेत शिका   

वेळ आणि पैशांची बचत

...

अमुल्य वेळ आणि हजारो रुपयांची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बचत

व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी, गृहिणी सेवानिवृत्त या सर्वांसाठी उपयुक्त

विषयाचे आकलन होईपर्यंत कितीही वेळा पुन्हा पुन्हा समजून घेता येणार  

सुलभ ऑर्डर आणि डिलिव्हरी
...

सर्व प्रोग्राम्स डाउनलोड, डीव्हीडी तसेच पेन ड्राईव्ह मध्ये उपलब्ध

डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबैंकिंग, मोबाइल वॅलेट तसेच UPI यांव्दारा सुरक्षित ऑनलाइन पेमेंट प्रणाली

संपूर्ण भारतात, अगदी ग्रामीण भागातही कॅश ऑन डिलीवरी सुविधा उपलब्ध  

मनोगत.. 

स्वयम् लर्न प्रोगाम्स विकसित करण्यामागची पार्श्वभूमी आणि प्रेरणा 
sadanand-kulkarni


नमस्कार! मी सदानंद कुलकर्णी. स्वयम् लर्न मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. प्रथम मी माझा परिचय देतो आणि स्वयम् लर्न प्रोग्राम्स विकसित करण्यामागे आमचा काय हेतु आहे हे थोड्या विस्ताराने निवेदन करतो.

सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी काही वर्षे कन्स्ट्रक्शन क्षेत्रात काम केले. मात्र चित्रकला आणि डिझायनिंगची पहिल्यापासूनच आवड असल्याने ग्राफिक्स आणि डिझायनिंग क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय मी घेतला. 


भारत सरकारच्या C-DAC  च्या National Multimedia Resource Centre मधून 2000 साली मल्टीमिडिया डिझायनिंग चे रितसर प्रशिक्षण घेतल्यानंतर पुण्यात  डिझायनिंग आणि कम्युनिकेशन क्षेत्रात मी व्यवसायाला सुरुवात केली.


2000 सालापासून आजवर ग्राफिक्स डिझायनिंग, अॅडव्हर्टायजिंग, आर्किटेक्चरल 3D डिझायनिंग, इन्जिनिअरिन्ग कॅड, वॉक थ्रू अॅनिमेशन्स, व्हिडीओ फिल्म्स, इंडस्ट्रीअल फोटोग्राफी, रेडिओ अॅडव्हर्टायजिंग अशा विविध सेवा असंख्य ग्राहकाना आम्ही देत आहोत. या ग्राहकांमध्ये अनेक क्षेत्रांतील लहान मोठे व्यवसायिक, शासकीय संस्था, भारतीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. या दरम्यान आमच्यासोबत काम करण्यासाठी अनेक नवीन कर्मचारी आले. ताज्या दमाच्या, उत्साही फ्रेशर्स सोबत काम करताना एक बाब वारंवार निदर्शनास यायची की त्यांचे या क्षेत्रातील ज्ञान आणि कौशल्य खुप प्राथमिक अवस्थेतील आहे. वेगवेगळ्या डिझायनिंग सॉफ्टवेअर्स मध्ये काम करताना लहान-सहान बाबींमध्ये त्याना अडचणी यायच्या. त्यांच्या कामाच्या गतीवर, दर्जावर आणि त्यांच्या आत्मविश्वासावरही याचा विपरीत परिणाम व्हायचा.


त्यांना बोलते केल्यावर लक्षात यायचे की नविन शिकण्याची आणि मेहनत घेण्याची  यांची तयारी आहे मात्र त्यानी जिथे ट्रेनिंग घेतले आहे तिथेच त्याना पुरेसे ज्ञान दिले गेले नाही. जिथे बेसिक प्रशिक्षणामध्येच अडचणी होत्या तिथे प्रोफेशनल ट्रेनिंग अणि स्किल डेव्हलपमेंट तर खुप दूरच्या बाबी होत्या. विशेषतः जिथे अनेक लहान-मोठे कॉम्प्यूटर कोर्सेस एकाच ठिकाणी सुरु असतात अशा ठिकाणी शिकून आलेल्या कर्मचा-यांची स्किल लेवल तर खुप खालच्या पातळीची असायची. ट्रेनिंग कोर्ससाठी हजारो रुपये खर्च करून, काही महिन्यांचा अनमोल वेळ ट्रेनिंग साठी देऊन सुद्धा या कर्मचाऱ्यांची अशी अवस्था पाहून वाईटही वाटायचे. त्यांच्या या समस्येचे मूळ कारण त्यांना मिळालेल्या ट्रेनिंगच्या क्वालिटीमध्ये आहे हे त्यानाही समजायचे.


ज्यांना ग्राफिक्स आणि डिझायनिंग क्षेत्रामधील नोकरी अथवा व्यवसायाचा अनुभव नाही, ग्राहकाला सेवा देताना त्याच्या गरजा ओळखून डिझायनिंग मध्ये वेगवेगळे प्रयोग कधी केले नाहीत अशीच मंडळी बहुतेक वेळा छोट्या-छोट्या कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर्स मध्ये व्यावसायिक कोर्सेस शिकवायला असतात. काही ठिकाणी तर मागच्याच एखाद्या बॅचचे विद्यार्थी प्रशिक्षक म्हणून काम करताना दिसतील. प्रशिक्षक मध्येच नोकरी सोडून गेला तर समस्यांमध्ये आणखी भर पडते. अशा ठिकाणी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी जेंव्हा नोकरी अथवा व्यवसाय करायला लागतो तेंव्हा लवकरच त्याच्या लक्षात येते की आपल्याला व्यवस्थित प्रशिक्षण मिळालेले नाही. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात ही अवस्था असेल तर इतर लहान-मोठ्या गावांमध्ये काय परिस्थिती असू शकते याची केवळ कल्पनाच करता येईल.


ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्या परीने काही प्रयत्न व्हावा आणि आपण काम करीत असलेल्या क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने आवश्यकता असलेले कुशल ग्राफिक डिझायनर्स तयार व्हावेत या प्रेरणेतून आम्ही स्वयम् लर्न प्रोग्राम्स विकसित करण्याचे ठरविले. स्वयम् लर्न प्रोग्राम्सच्या माध्यमातून ग्राफिक्स डिझायनिंग सॉफ्टवेअर्स चे बेसिक ते एडव्हान्सड् लेव्हलचे प्रोफेशनल ट्रेनिंग आपल्याला घरच्या घरी मराठी मध्ये अतिशय कमी किमतीमध्ये मिळणार आहे. डिझायनिंग सॉफ्टवेअर्स मधील बारकावे, वेगवेगळी टूल्स, त्यांचे प्रॅक्टिकल उपयोग, प्रोफेशनल ट्रिक्स आणि टिप्स आपल्याला शिकायला मिळणार आहेत. जवळपास प्रत्येक लेसन मध्ये काही ना काही असाइनमेंट असलेले हे भरगच्च लर्निंग प्रोगाम्स आहेत. निकट भविष्यामध्ये अडोबी इलस्ट्रेटर, अडोबी इन डिजाइन, थ्री डी स्टूडियो मॅक्स, अडोबी फ्लॅश, स्केचप असे विविध लर्निंग प्रोग्राम स्वयम् लर्न मार्फत उपलब्ध केले जाणार आहेत.


डिझायनिंग क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी, नवनवीन कल्पना सुचण्यासाठी सर्वात प्रथम 'क्रिएटीव थिंकिंग' आवश्यक आहे. त्यातूनच नवनवीन कल्पनांचा जन्म होतो. मात्र मनातील या कल्पनांना प्रत्यक्ष साकार करण्यासाठी डिझायनिंग सॉफ्टवेअर मधील निपुणता आणि ते सॉफ्टवेअर हव्या त्या पद्धतीने वापरण्याचे व्यावसायिक कौशल्य गरजेचे असते. आजच्या डिजिटल युगात ज्याच्याकडे हे कौशल्य असेल तोच/तीच त्यांच्या मनातील क्रिएटिव आइडियाज उत्तम पद्धतीने सादर करू शकतात. स्वयम् लर्न प्रोग्राम च्या माध्यमातून हे कौशल्य विकसित करणे आणि जॉब रेडी / इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल्स तयार करणे हाच आमचा प्रयत्न आहे. 'स्वयम् लर्न' च्या माध्यमातून तंत्रज्ञानाचे, कौशल्याचे आणि आत्मविश्वासाचे बळ असलेली पिढी तयार व्हावी ही प्रेरणा 'स्वयम् लर्न' प्रोग्राम्स विकसित करण्यामागे आहे.


स्वयम् लर्न प्रोग्राम मधून व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन योग्य मेहनत आणि पुरेसा सराव करून आपण आत्मविश्वासाने नोकरी, व्यवसायामध्ये पहिले पाऊल ठेवाल आणि अल्पावधीतच प्रगतीची शिखरे सर कराल असा आम्हाला विश्वास वाटतो. ग्रामीण भागात जिथे प्रोफेशनल ट्रेनिंगच्या सुविधा नाहीत, महानगरांमध्ये बहुतेकांकडे ट्रेनिंग साठी वेगळा वेळ उपलब्ध नाही, आणि हजारो रुपये, अनमोल वेळ खर्च करूनही प्रोफेशनल ट्रेनिंग मिळेल की नाही याची खात्री नाही अशा परिस्थिती मध्ये स्वयम् लर्न प्रोग्राम्स सर्वांसाठी ज्ञानाचा पासवर्ड, कौशल्याची गुरुकिल्ली आणि सफलतेचा मार्ग ठरतील असा विश्वास वाटतो. 


सर्वाना अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद .


सदानंद कुलकर्णी,


संचालक स्वयम् लर्न

sadanand@swayamlearn.com


स्वयम् लर्न प्रोग्राम्स सर्वोत्तम पर्याय का आहेत?

सर्व बाजूने विचार केल्यास तुम्हीच सांगाल की ग्राफिक्स आणि डिझायनिंग प्रोफेशनल होण्यासाठी स्वयम् लर्न प्रोग्राम्सनाच प्राधान्य असायला हवे.

कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मधील कोर्सेस 

● प्रशिक्षकाच्या प्रशिक्षण पात्रतेची खात्री देता येत नाही
● प्रशिक्षक स्वतः अनुभवी डिझाईनिंग व्यावसायिक असतील याची खात्री नाही
● एका ट्रेनिंग कोर्सची फीस किमान तीन ते पाच हजार रुपये 
● दररोज किमान दोन तास असे तीन ते चार महिने चालणारे ट्रेनिंग
● क्लासला जाण्यासाठी बस, पेट्रोल यांचा खर्च आणि प्रवासात जाणारा अतिरिक्त वेळ
● ट्रेनिंग फीस, प्रवास खर्च आणि वेळ यांची एकत्रित किंमत किमान आठ ते बारा हजार रुपये  
● नोकरी / व्यवसायासाठी आवश्यक असलेले ट्रेनिंग मिळेलच याची खात्री नाही
● ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर पुन्हा गाईडेड रिव्हिजन करता येत नाही 

स्वयम् लर्न प्रोग्राम्स 

● मान्यताप्राप्त, प्रतिष्ठित संस्थांमधून शिक्षण घेतलेले प्रशिक्षक
● ग्राफिक्स डिझायनिंग व्यवसायातील अनुभवी व्यावसायिकांनी तयार केलेले प्रोग्राम्स
● प्रत्येक लर्निंग प्रोगाम केवळ 700 ते 800 रुपयात डाउनलोड करण्यास उपलब्ध 
● स्वतःच्या उपलब्ध वेळेत आणि स्वतःच्या गतीने, जलद शिकता येते
● घरच्या घरी प्रोफेशनल ट्रेनिंग, कुठेही जाण्याची आवश्यकता नाही
● कोणताही अप्रत्यक्ष खर्च करावा लागत नाही
● नोकरी व्यवसायासाठी आवश्यक स्कील डेव्हलप करणारे प्रोफेशनल ट्रेनिंग
● हव्या त्या वेळी कितीही वेळा गाईडेड रिव्हिजन करता येते      

या आहेत काही यशोगाथा.. 

अशीच एक सक्सेस स्टोरी उद्या तुमचीही असेल.

मी १९९९ पासून प्रोफेशनल फोटोग्राफीचा व्यवसाय करतो. तसेच कमर्शिअल आणि वेडिंग फोटोग्राफीचे अनेक वर्कशॉप आयोजित केले आहेत. स्वयम् लर्न विषयी मला माहिती मिळाल्यानंतर उत्सुकता म्हणून मी त्यांचे सर्व लर्निंग प्रोग्राम्स खरेदी केले. संपूर्ण प्रोग्राम्स पाहिल्यानंतर मला सुखद आश्चर्याचा धक्का बसला. उत्तम भाषा, बारकाव्यानिशी विषय समजून देण्याची हातोटी मला आवडली. गुंतागुंतीच्या संकल्पना सुद्धा सहजपणे समजावून सांगितलेल्या असल्याने मला सुद्धा काही बाबी नव्याने समजल्या. फोटोशॉप अगदी बेसिक पासून शिकवणारा हा प्रोग्राम सर्वांनी शिकवा असाच आहे.

मी एका जाहिरात संस्थेमध्ये क्लीरीकल काम करत होते. ग्राफिक्स आणि डिझायनिंगचा माझा तसा संबंध नव्हता. पण एजन्सी मधील आर्टिस्टस् चे काम अनेक वर्षे पाहून आणि ग्राहकांशी बोलून माझी कल्पना शक्ती विकसित होत गेली. पण प्रत्यक्ष डिजिटल डिझाईन मला करता येत नव्हते कारण मला फोटोशॉप, कोरल ड्रॉ यासारखी सॉफ्टवेअर्स वापरता येत नव्हती. कामातून वेळ काढून क्लास लावता येणे शक्य नव्हते. माझ्या ऑफिस मधील सिनिअर आर्टिस्टने स्वयम् लर्न विषयी सांगितले आणि हा सेल्फ लर्निंग प्रोग्राम मी झपाटल्यासारखा पूर्ण केला. भरपूर सराव केला. आता मी ऑफिस मध्ये क्लार्क नव्हे तर ग्राफिक डिझायनर म्हणून काम करते आहे. पुढे चालून मला माझी छोटी का असेना पण स्वतःची जाहिरात एजन्सी सुरु करायची आहे. हा आत्मविश्वास आणि कौशल्य मला स्वयम् लर्न प्रोग्राम मधून मिळालेल्या प्रोफेशनल ट्रेनिंग मधून मिळाले.    

नोकरी करणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला मुंबईच्या धावपळीच्या जीवनात कॉम्प्युटर इंस्टिट्यूट मध्ये जाऊन पाच महिन्यांचा ग्राफिक डिझाईनिंगचा कोर्स करणे अशक्य होते. त्यासाठी सांगितलेली पंधरा हजार रुपये फिस सुद्धा मला परवडणारी नव्हती. मला स्वयम् लर्न विषयी माहिती त्यांच्या वेबसाईटवर मिळाली, फ्री डेमो लेसन्स डाउनलोड करून पहिली आणि लगेच लर्निंग डीव्हीडीज मागवल्या. रोज रात्री दहा ते साडेबारा असे मी एक महिना शिकत होतो. वेळ मिळेल तशी प्रॅक्टिस केली. केवळ एका महिन्यात मी फोटोशॉप आणि कोरल ड्रॉ या दोन्ही सॉफ्टवेअर्स मध्ये सहजपणे काम करू लागलो. माझी ही प्रगती पाहून माझे मित्र आणि कुटुंबीय सुद्धा आश्चर्यचकित झाले. माझ्या प्रगतीचा मार्ग मला स्वयम् लर्न मुळे सापडला.

मी सिव्हील इंजिनिअर असून तीस वर्षांपासून कंस्ट्रक्शन क्षेत्रात कार्यरत आहे. ऑटोकॅड शिकण्याची माझी अनेक वर्षांपासून इच्छा होती. व्यस्ततेमुळे क्लास लावणे शक्य नव्हते. पुस्तके आणून मी स्वतः शिकण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. नंतर अपघातानेच मला स्वयम् लर्न विषयी समजले. त्यांचा ऑटोकॅडचा लर्निंग प्रोग्राम मी घेतला. हा प्रोग्राम एका अनुभवी सिव्हील इंजिनिअरने तयार केलेला असल्याने मला हवे असलेले सगळे यात शिकता आले. आता मी संपूर्ण इंजिनिअरिंग ड्रॉइंग तयार करू शकतो.    

मी प्राथमिक शिक्षक असून फोटोशॉप व ग्राफिक्स डिझाईन यात किमान आपल्या शाळेतील व आवश्यक तेवढे काम करता यावे म्हणून गेली 2 ते 3 वर्षा पासून फोटोशॉप व कोरल ड्रॉ शिकण्याचा प्रयत्न करत होतो, पण इंस्टिट्यूट मध्ये जाऊन शिकण्यासाठी वेळ मिळत नव्हता. इकडून तिकडून, YouTube वरील व्हिडिओ पाहून शिकण्याचा प्रयत्न करत होतो पण बेसिक ते ऍडव्हान्स व टूल वाईज आणि मातृभाषेत व्हिडिओ किंवा इतर माहिती उपलब्ध होत नव्हती. इंटरनेट वर सर्च करत असताना स्वयम् लर्न सेल्फ लर्निंग प्रोग्राम्स विषयी माहिती मिळाली. मी स्वयम् लर्नचे फ्री लेसन्स पाहून प्रभावित झालो, सोप्या व समजेल अशा पद्धतीने व मातृभाषेतून केवल लर्निंग प्रोग्राम नव्हे ऑफलाईन गुरू मिळाला या आनंदाने लागलीच मी फोटोशॉप व कोरल ड्रॉ चे सर्व लेसन उपलब्ध केले व स्वयम् लर्नच्या मदतीने, माझ्या वेळेनुसार व माझ्या गतीने फोटोशॉप व कोरल ड्रॉ शिकलो आहे. नावाप्रमाणे 'स्वतः शिका' हे सार्थ करणारे सेल्फ लर्निंग प्रोग्राम्स उपलब्ध करून दिल्या बद्दल मी स्वयम् लर्न टीम चा मनापासून आभारी आहे, खूप खूप धन्यवाद.

मै एक फोटोग्राफर हु और लगभग 5 - 6 साल से फोटोग्राफी का काम कर रहा हूँ लेकिन मुझे अपनी एलबम तैयार करने के लिए दूसरों के पास जाना पडता था। इसमें काफी समय और कमाई का मोटा हिस्सा चला जाता था| मुझे स्वयम् लर्न का नम्बर मिला और मैंने संपर्क किया| मेरे हर सवाल का जवाब मुझे यहाँ मिला| और मैंने डीवीडी मंगवाई और आज मैं आसानी से Adobe Photoshop में काम रहा हूँ और वह भी पहले से कई गुना बेहतर| अब दुसरे काम भी मेरे पास आने लगे है| थैंक यु स्वयम् लर्न|

मैं पहले स्क्रीन प्रिंटिंग से वेडिंग इनविटेशन कार्ड, विजिटिंग कार्ड बनाया करता था| आजकल यह काम कंप्यूटर पर बने कलरफूल ग्राफिक्स और डिजिटल प्रिंटिंग से होने लगा है| इस काम को कैसे करते है यह मैं नहीं जानता था| स्वयम् लर्न Corel Draw लर्निंग डीवीडी से पूरा ग्राफिक डिजाइनिंग सिखने के बाद मेरा काम करने का तरीका ही पूरी तरह से बदल गया है| अब मेरे प्रतिस्पर्धियों के मुकाबले मेरा काम काफी सुधर गया है| मैं अब कुशलता के साथ लोगो डिज़ाइन, ब्रोशर डिज़ाइन, विजिटिंग कार्ड्स, फ्लेक्स बोर्ड डिजाईन बना रहा हूँ| यह परिवर्तन केवल स्वयम् लर्न ही व्दारा आया है|

कई महीनों से मुझे Adobe Photoshop सिखना था| किताबें लाकर मैंने सिखने का प्रयास किया मगर बात नहीं बनी| यूट्यूब विडिओ देखकर भी मैंने प्रयास किया मगर वहां के विडिओ अलग अलग होते है| उनमें कोई सिक्वेंस नहीं था| मैं जगह जगह पर अटक जाता था| छोटी छोटी प्रॉब्लम सॉल्व करने में काफी टाईम बर्बाद होता था| अंततः इंटरनेट से ही मुझे स्वयम् लर्न के बारे में जानकारी मिली| उनके कोर्स के अच्छे खासे डिटेल्स पढ़कर और प्रोग्राम की मामूली कीमत देखकर मुझे पहले अविश्वास ही हुआ| मैंने पहले फ्री डेमो लेसन डाऊनलोड किये और विश्वास होने के बाद मैंने प्रोग्राम ख़रीदा| मगर जैसे ही मैंने स्वयम् लर्न प्रोग्राम से सिखना शुरू किया तो मैं बिलकुल रुका नहीं| केवल एक सप्ताह में मैंने करीब पूरा कोर्स कम्प्लीट किया| अब Photoshop में मैं हर एक चीज कर सकता हूँ जो मैं चाहता था| स्वयम् लर्न प्रोग्राम तो हाई क्वालिटी है ही, साथ ही इनकी आफ्टर सेल सर्विस भी बिलकुल प्रोफेशनल है| स्वयम् लर्न को ढेर सारी शुभकामनाएं|

मैं एक छोटे गाँव में रहता हूँ यहाँ कोई कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर नहीं है| शहर में जाकर सीखना मेरे लिए नामुमकिन था| मैंने निराश होकर ग्राफिक डिजाइनर बनने का सपना छोड़ दिया था| मगर मेरे दोस्त ने मुझे स्वयम् लर्न डीवीडी की जानकारी दी| मुझे पहले विश्वास नहीं हुआ, लगा यह शायद कुछ चिटिंग का मामला हो सकता है, यहाँ से हाथ कुछ नहीं लगेगा| फिर भी मैंने रिस्क उठाई और मैंने Corel Draw और Photoshop की स्वयम लर्न की डीवीडीज मंगवाई और अपने घर में ही सीखना स्टार्ट किया| अब मैं बहुत ही काम दिनों में फ्लेक्स बैनर होर्डिंग, वेडिंग कार्ड, विज्ञापन डिजाइन कर रहा हूँ| ग्राफिक डिजाइनर बनने का मेरा सपना केवल चंद रुपयों में और घर बैठे पूरा हुआ| मेरी कमाई भी शुरू हो गई| मेरा जीवन बदलने के लिए स्वयम लर्न कंपनी को मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ|

मी रायगड जिल्ह्यातील रोहा या छोट्या शहरात राहतो. प्रोफेशनल व्हीडीओ एडिटिंग शिकण्यासाठी मी अनेक प्रयत्न केले मात्र आमच्या गावात ही सुविधा उपलब्ध नव्हती. मोठ्या शहरात शिकण्यासाठी जाणे मला शक्य नव्हते. तिथली ट्रेनिंग कोर्सची फीस पण खूप होती. एक प्रयत्न म्हणून मी स्वयम् लर्न प्रोग्रामच्या माध्यमातून व्हीडीओ एडिटिंग घरच्या घरी शिकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मी साशंक होतो मात्र अतिशय सोप्या पद्धतीने आणि तपशीलवार शिक्षण देणारा हा प्रोग्राम असल्याने मी अतिशय कमी वेळात प्रोफेशनल व्हिडीओ एडिटिंग घर बसल्या शिकू शकलो. त्यानंतर मला  पहिले व्यावसायिक काम मिळाले. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टची व्हीडीओ फिल्म मी तयार केली. त्यानंतर अनेक कामे मला मिळत गेली.  स्वयम् लर्नने मला आत्मविश्वास दिला, मार्ग दाखवला आणि आयुष्यभर उपयोगास येणारे कौशल्य दिले.       

FAQs

तुमच्या मनातील काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे 

स्वयम् लर्न प्रोग्राम्स नक्की काय आहेत? त्यांचे निश्चित स्वरुप काय आहे ?


ग्राफिक डिजाइनिंग आणि मल्टीमीडिया सॉफ्टवेअर्सचे घरबसल्या प्रोफेशनल ट्रेनिंग देने देणारे 'स्वयम् लर्न' हे सेल्फ लर्निंग प्रोग्राम्स आहेत. व्हिडीओ ट्युटोरियल्स व्दारा लाइव्ह डेमॉंस्ट्रेशन हा यांचा मुख्य आधार आहे. ग्राफिक डिजाइनिंग, मल्टीमीडिया, थ्रीडी डिजाइनिंग, फोटोग्राफी आणि व्हिडीओ प्रॉडक्शन क्षेत्रात पुणे इथे काम करणाऱ्या अनुभवी प्रोफेशनल्सनी हे प्रोग्राम्स विकसित केले आहेत.

...


स्वयम् लर्न प्रोग्राम की आणखी काय वैशिष्ट्ये आहेत? मी यांचा स्वीकार का करावा ?


स्वयम् लर्न प्रोग्राम्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या गतीने , उपलब्ध असलेल्या वेळेत शिकू शकता. अडोबी फोटोशॉप सारखे व्यावसायिक सॉफ्टवेअर स्वयम् लर्नच्या माध्यमातून केवळ एका आठवड्यात शिकल्याची अनेक उदाहरणे आमच्याकडे आहेत. वेळेप्रमाणेच हजारो रुपयांची बचत हे स्वयम् लर्नचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. इंस्टिट्यूटमध्ये द्यावी लागणारी हजारो रुपये फीस, रोजचा येण्याजाण्याचा खर्च आणि या सर्वांसाठी दैनंदिन कामातून काढावा लागणारा वेळ या सर्व बाबींचा विचार केला तर एक सॉफ्टवेअर शिकण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बराच खर्च करावा लागतो. या तुलनेत स्वयम् लर्न प्रोग्राम्स सर्व दृष्टीने बचत करणारे आहेत. ते अनुभवी प्रोफेशनल्सनी विकसित केलेले असल्याने त्यातून नेमके आणि दर्जेदार प्रशिक्षण खात्रीने मिळणार आहे.

...


स्वयम् लर्न प्रोग्रामच्या माध्यमातून मी एक एक्सपर्ट प्रोफेशनल बनु शकतो का ?


कोणत्याही व्यवसायातील एक्सपर्ट बनण्यासाठी चांगले ट्रेनिंग त्यानंतर कठोर मेहनत आवश्यक असते. त्यापैकी दर्जेदार ट्रेनिंग देण्याची व्यवस्था स्वयम् लर्नने केली आहेच. एखाद्या विद्यार्थ्याला व्यावसायिक बनविण्यासाठी त्याला शिकवणारा शिक्षक अनुभवी व्यावसायिक आहे की नाही हे ही महत्वाचे असते. पंधरा ते वीस वर्षे ग्राफिक्स आणि मल्टीमिडीया क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांनी स्वयम् लर्न प्रोग्राम विकसित केलेले असल्यामुळे या माध्यमातून व्यावसायिक घडावेत हाच उद्देश्य आहे. मिळालेल्या ट्रेनिंगला आपण कल्पनाशक्ती, निरंतर सराव आणि कठोर मेहनीतीची जोड दिली आणि सोबत आपल्या क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून वाटचाल केली तर एक्स्पर्ट प्रोफेशनल बनण्यापासून तुम्हाला कोण रोखेल?

...

यापूर्वी मी बाजारात उपलब्ध पुस्तके खरेदी करून फोटोशॉप आणि कोरल ड्रॉ शिकण्याचा प्रयत्न केला होता. पुस्तकात पाहून डिझायनिंग सॉफ्टवेयर्स शिकणे मला खूप निरस आणि कठीण वाटले. कंटाळून शेवटी मी प्रयत्न सोडला. स्वयम् लर्न प्रोग्राम वापरून मी शिकू शकेन का?


निश्चित ! स्वयम् लर्न प्रोग्रामच्या माध्यमातून ही सॉफ्टवेयर्स तुम्ही सहजतेने शिकू शकाल. एखाद्या सिनेमाची छापील कथा वाचणे आणि तो सिनेमा प्रत्यक्ष बघणे यात जो फरक आहे तोच बाजारातील पुस्तके आणि स्वयम् लर्न प्रोग्राम्स यांच्यामध्ये आहे. ऑडियो व्हिज्युअल कम्युनिकेशन हे स्वयम् लर्नचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. आपण जे शिकणार आहात त्याचे संगतवार डेमॉंस्ट्रेशन आपण पाहात असता. स्वयम् लर्न प्रोग्राम्स ची भाषा ही सरळ आणि सहज आहे. त्यामुळे शिकणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये कोणतीही शंका उरत नाही. एखादा शिक्षक शेजारी बसून शिकवत असल्याचा अनुभव यातून मिळतो. स्वयम् लर्न प्रोग्राम्सची सुरुवातीची लेसन्स आपण मोफत डाउनलोड करून पाहू शकता. ती पाहिल्यावर तुमची खात्री पटेल की स्वयम् लर्न प्रोग्राम च्या माध्यमातून तुम्ही नक्की आणि सहजतेने शिकाल. 

स्वयम् लर्न प्रोग्राम्सच्या जवळपास प्रत्येक लेसन मध्ये काही ना काही प्रोजेक्ट किंवा असाइनमेंट आहेत. त्यासाठी लागणाऱ्या एक्सरसाइज फाइल्स सुद्धा प्रोग्राम सोबत दिल्या आहेत. या सगळ्या बाबी पाहता स्वयम् लर्न हे कम्पलीट लर्निंग सोल्यूशन आहे.

...


फोटोशॉप आणि कोरल ड्रॉ या मध्ये एकाच प्रकारचे काम केले जाते का? मी या पैकी काय शिकू? 


फोटोशॉप हे इमेज एडिटिंग सॉफ्टवेअर आहे. फोटोग्राफी, वेडिंग अल्बम डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, वेब डिझायनिंग, डीटीपी अशा क्षेत्रांमध्ये इमेजेस एडिटिंग आणि काम्पोजिशन्स करण्यासाठी फोटोशॉप वापरले जाते. कोरल ड्रॉ हे ग्राफिक डिझायनिंगचे सॉफ्टवेअर आहे. लोगो डिझायनिंग, जाहिराती, ब्रोशर्स, मासिके आणि सर्व प्रकारचे कमर्शिअल प्रिंटींग करण्यापूर्वी केले जाणारे ग्राफिक डिझायनिंग कोरल ड्रॉ मध्ये केले जाते. तुमचा उद्देश्य केवळ फोटोग्राफीशी संबंधित असेल तर फोटोशॉप शिकणे पुरेसे आहे. मात्र या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या डिझायनिंग व्यवसायात काम करायचे असेल तर कमीतकमी फोटोशॉप आणि कोरल ड्रॉ ही दोन्ही सॉफ्टवेअर शिकणे गरजेचे आहे

...

स्वयम् लर्न प्रोग्राम सोबत सम्बंधित सॉफ्टवेअर सुद्धा मिळेल का ? 


स्वयम् लर्न प्रोग्राम सोबत कोणतेही सॉफ्टवेअर दिले जात नाही.

...


स्वयम् लर्न प्रोग्राम मला माझ्या घरी आणि ऑफिस वापरायचा आहे . एकच डीव्हीडी मी दोन ठिकाणी इंस्टॉल करू शकतो का?


स्वयम् लर्न प्रोग्राम एका आणि त्या एकमेव कॉम्प्युटर मध्ये ऍक्टिवेट केला जातो. तुम्हाला एकापेक्षा अधिक कॉम्प्युटर मध्ये स्वयम् लर्न प्रोग्राम वापरायचा असेल तर अशा प्रत्येक कॉम्प्युटर साठी वेगळे लायसेन्स खरेदी करावे लागेल. त्यासाठी आपल्याला डिस्काऊंट मिळेल. 

...


स्वयम् लर्न प्रोग्राम मधील व्हिडिओ लेसन्स मी टीव्ही किंवा मोबाईल फोन मध्ये पाहू शकतो का?


स्वयम् लर्न प्रोग्राम्स मधील व्हिडीओ लेसन्स केवळ मायक्रोसॉफ्ट विंडोज असलेल्या कॉम्प्युटर वर पाहता येतील. टिव्ही तसेच लिनक्स, ऍड्रॉइड, आय ओ एस सिस्टिमस् वर पाहता येणार नाहीत.  

...


मी एक हौशी फोटोग्राफर आहे. मला फोटोशॉपचे प्राथमिक ज्ञान हवे आहे. जे वापरून मी काढलेल्या फोटोंचे मी बेसिक एडिटिंग करू शकेन. मला संपूर्ण फोटोशॉप शिकावे लागेल का ?


आपल्या सारख्या हौशी कलाकारांसाठी आम्ही 'स्वयम् लर्न फोटोशॉप बेसिक टू ऍडव्हान्सड्' या प्रोग्राम या प्रोग्रामची सुरुवातीची पंधरा लेसन्स मोफत डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहेत. यातून आपण फोटोज चे बेसिक आणि ऍडव्हान्सड् लाइट/कलर करेक्शन करणे, चेहऱ्यावरील डाग, धब्बे काढून टाकणे, इमेज क्रॉप करणे, इमेजमधील अनावश्यक घटक काढून टाकणे या बाबी शिकू शकाल

...


स्वयम् लर्न प्रोग्राम्स वापरताना मी माझ्या समस्या, प्रश्न कसे सोडवू? मी स्वयम् लर्नच्या संपर्कात कसा राहू शकतो ?


स्वयम् लर्न प्रोग्राम्स विकसित करतानाच शिकणाऱ्या व्यक्तीच्या अपेक्षित शंकांचे निरसन होईल याची काळजी घेतली गेली आहे. तरीही आपल्या मनात काही शंका असेल किंवा काही विशेष माहिती आपल्याला हवी असेल तर आपण स्वयम् लर्नच्या फेसबुक पेज वर आपण त्या पोस्ट करु शकता.

...

आपल्याला काही विचारायचे आहे का ?

कृपया आपला प्रश्न, शंका विचारा. आम्ही आपणाशी संवाद साधायला उत्सुक आहोत. आम्ही आपल्याशी इमेल अथवा फोन व्दारे संपर्क साधू.

FOLLOW US