open source website creator
DVD-cover-white

Corel Draw X6 Basic to Advanced
Marathi Self Learning Programme 

● अनुभवी इंडस्ट्री प्रोफेशनल व्दारा ट्रेनिंग
● 75 व्हिडिओ लेसन्स
● बेसिक से ऍडव्हान्सड् लेवल पर्यंत ट्रेनिंग
● क्रिस्टल क्लियर हाय डेफिनिशन व्हिडिओज्
● असाइनमेंट्स आणि प्रोजेक्ट्स समाविष्ट
● इंटरनेटची आवश्यकता नाही

Corel Draw X6 हे व्हेक्टर ग्राफिक्स डिझायनिंग साठी भारतात सर्वाधिक वापरले जाणारे सॉफ्टवेअर आहे. प्रिंटींग, पब्लिशिंग, जाहिराती, वेब डिझायनिंग या क्षेत्रांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. डिझायनिंग क्षेत्रातील हे मुलभूत सॉफ्टवेअर आहे.


'स्वयम् लर्न कोरल ड्रॉ एक्स 6 बेसिक ते ऍडव्हान्स" या सेल्फ लर्निंग प्रोग्रॅम मध्ये कोरल ड्रॉ च्या परिचयापासून विविध प्रकारे ग्राफिक्स डिझायनिंग करणे, व्हिजिटिंग कार्ड, लोगोज ते मासिके, पुस्तके यांचे डिझायनिंग करणे, जाहिराती, होर्डिंग डिझाईन करणे, प्रिंटींग साठी त्यांचे प्रोफेशनल आउटपूट कसे मिळवावे ही कौशल्ये घरच्या घरी सुलभतेने शिकता येणार आहेत.  


प्रोग्राम मध्ये एकूण 69 लेसन्स आहेत. ही सर्व लेसन्स सध्या, सोप्या मराठी भाषेतील असून हाय डेफिनेशन व्हिडिओ फॉरमॅट मधील आहेत. लेसन मध्ये शिकलेल्या भागाचे प्रात्यक्षिक तुम्हाला स्वतःला करून पाहण्यासाठी या स्वयम् लर्न प्रोग्राम मध्ये प्रोजेक्ट फाइल्स सुद्धा देण्यात आल्या आहेत.


LIST OF LESSONS

Download first 14 lessons for free

001 Introduction ▼

002 Document settings ▼

003 Raster vs vector ▼

004 Rectangle ▼

005 Colour fill ▼

006 Outline ▼

007 Object handeling ▼

008 Shapes-1 ▼

009 Shapes-2 ▼

010 Copy, Zoom, Pan, Mirror ▼

011 Move, Snap, Nudge, Rotate ▼

012 Freehand tool ▼

013 Node editing ▼

014 Assignment Flower ▼

015 Smart fill

016 Background design

017 Drawing tools

018 Calligraphic text

019 Bspline

020 Simple logo designing

021 Detailed Node Editing

022 Graphics designing

023 SBI Logo

024 Mahindra Logo

025 Construction logo designing


026 Artistic Text

027 Text on path

028 Devnagari lipi

029 Corportae brochure designing

030 Paragraphic text

031 Text warp

032 Continue text in books

033 Insert Page Number

034 Special characters

035 Colour models

036 Fill tools

037 Interactive fill

038 Logo & Visiting card designing

039 Gold seal designing

040 3D logo designing

041 Mesh fill

042 Lotus flower designing

043 Abstract Tricolour designing

044 Knife and Eraser

045 Shaping tools

046 Power clip

047 Magazine cover designing

048 Cloning

049 Symbol

050 Rulers Guides and Grid


051 Dynamic and alignment guides

052 Object alignment

053 Dimensions

054 Object transformation

055 Shape editing tools

056 Blend-Frames-Abstract line waves

057 Contour

058 Distort

059 Envelope

060 Extrude

061 Transparency

062 Shadows

063 Tables

064 layers-1

065 Layers-2

066 Master Page

067 Bitmap correction

068 Bitmap tracing

069 File operations

070 Layout for printing

071 Post script

072 Fashion Advertise design

073 I-Card mass production

074 Flex-Hoarding design

075 Wedding card designing


Download Now

Corel Draw X6 Basic to Advanced
Marathi Self Learning Programme  

Rs. 1090

Single user / 2 Year's licence
For Windows PC + Android mobile phone / tab

प्रथम फ्री डाऊनलोड करा, अॅक्टिवेशन करताना ऑनलाइन पेमेंट करा
त्वरित शिकायला सुरु करा 

डाउनलोड साइझ: 701 MB
एकसरसाइज फाइल्स: 25 MB

 DOWNLOAD ORDER NOW

Other options for payment

Cash Deposit / Online banking (NEFT/ IMPS)

Name of bank: Bank of India
Branch: Kothrud, Gujrat Colony, Pune
Name of account : Digital Canvas 
Account no: 052320100000577
Account type: Current Account
IFSC: BKID0000523

Pay by BHIM / UPI

UPI ID: swayamlearn@upi

Corel-Draw-graphics-collection-DVD-cover

Corel Draw Professional Graphics Collection

● 400+ मॉडर्न, स्टायलिश 2D आणि 3D लोगोज (इंग्रजी अक्षरे आणि व्यवसायांप्रमाणे)
● 140 आकर्षक व्हिजिटिंग कार्ड डिझाईन्स
● 400+ वेडिंग कार्ड डिझाइनिंग साठी क्लिपआर्ट्स
● 100+ मराठी कॅलीग्रफिक टेक्स्ट डिझाईन्स
● रेडी टू युज पूर्णपणे एडीट करता येणाऱ्या ग्राफिक्स. 

FAQs

मला ग्राफिक्स डिझाईनिंग आणि पब्लिशिंग क्षेत्रात काम करायचे आहे. यासाठी फक्त Corel Draw शिकले तर चालेल का?


Corel Draw हे व्हेक्टर डिझायनिंगचे सॉफ्टवेअर आहे. यात अगदी लहान लोगो पासून विशालकाय होर्डिंग पर्यंत सर्व प्रकारचे कमर्शिअल ग्राफिक्स डिझाईन करता येतात. जहिराती, ब्रोशर्स, मासिके यात वापरल्या जाणाऱ्या इमेजेस एडीट करण्यासाठी, फोटोंचे काम्पोजीशन्स तयार करण्यासाठी मात्र  Adobe Photoshop वापरले जाते.  कोणत्याही कमर्शिअल ग्राफिक्स मध्ये फोटोज आणि इमेजेस हा मोठा आणि महत्वपूर्ण घटक असतो. त्यामुळे ग्राफिक्स डिझाईनिंग आणि पब्लिशिंग क्षेत्रात काम काम करण्यासाठी कोरल ड्रॉ आणि फोटोशॉप ही दोन्ही सॉफ्टवेअर्स शिकावी लागतील. स्वयम् लर्न अडोबी फोटोशॉप बेसिक ते ऍडव्हान्सड् या लर्निंग प्रोग्राम मध्ये प्रोफेशनल इमेज एडिटिंग आणि इमेज काम्पोजीटिंग शिकता येईल. 


 माझ्या डिझाईन्स मध्ये मी मराठीचा वापर करू इच्छितो परंतु मराठी टायपिंग साठी लागणारे सॉफ्टवेअर आणि फॉन्टस् माझ्याकडे नाहीत. मी काय करू?


Corel Draw मध्ये आर्टवर्क सोबत मराठी किंवा देवनागरी टेक्स्ट श्रीलिपि , कृतिदेव, आयएसएम् अशा कमर्शिअल फॉण्टस् चा वापर केला जातो. तसेच गुगलने  मोफत उपलब्ध करून दिलेले  44 सुन्दर देवनागरी गूगल फोंट्सचाही वापर आपण करू शकता. हे सर्व यूनिकोड फॉण्टस् आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले Google input tools आणि Google fonts इंस्टॉल करणे आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर यांचे सविस्तर मार्गदर्शन करणारा व्हिडीओ स्वयम् लर्न ने तयार केला आहे. तो स्वयम् लर्नच्या  यूट्यूब चॅनल पाहता येईल. युनिकोड फॉण्टस्  कोरल ड्रॉ एक्स 6 पूर्वीच्या म्हणजेच  X3, X4, X5 या व्हर्जन मध्ये व्यवस्थित काम करत नाहीत हे मात्र लक्षात असावे.

...


मी  Adobe Pagemaker मासिकांचे डिझाईनिंग करतो / करते. Corel Draw मध्ये ते केल्याने काही फायदा होईल का?


मासिके, बुकलेट, ब्रोशर्स, यूजर मॅन्युअल यांचे  पेज लेआऊट आणि संपूर्ण डिझाईनिंग करण्यासाठी  Corel Draw अनेक नवीन फीचर्स आहेत. पेज लेआउट तयार करण्यासाठी मास्टर पेज, लेयर्स, नॉन प्रिन्टेबल लेयर्स, टेक्स्टचे फॉर्मेटिंग करण्यासाठी अनेक टूल्स आणि फिचर्स कोरल ड्रॉ मध्ये आहेत. सोबत अशा आर्टवर्क साठी लागणारे इतर लहानमोठे ग्राफिक्स  कोरल ड्रॉ मध्येच तयार करता येतात. पेजमेकर मध्ये या पद्धतीने काम करता येत नाही. पेज मेकर हे पंधरा वर्षांपूर्वी विकसित केलेले पेज लेआउट सॉफ्टवेअर आहे. ते आता कालबाह्य झालेले आहे आणि त्यात ग्राफिक्स डिझाईन करता येत नाही. कोरल ड्रॉ मध्ये मात्र अशी मर्यादा नाही.

...


Corel Draw मध्ये मी तयार केलेल्या ग्राफिक्सचे कलर्स प्रिंटींग नंतर कागदावर वेगळेच दिसतात. याचे काय कारण असेल?


यामागे अनेक कारण असू शकतात. कॉम्प्युटर मॉनिटर हे RGB सिस्टिम मध्ये कलर प्रदर्शित करतात. आणि कोरल ड्रॉ मध्ये कमर्शिअल प्रिंटींग साठी CMYK कलर्स असलेले ग्राफिक तयार केले जातात. ग्राफिक मध्ये प्रिंटींग साठी वापरलेले CMYK कलर्स कॉम्प्युटर मॉनिटर वर दाखवताना इलेक्ट्रॉनिक सिग्नल अर्थात RGB सिस्टीम मध्ये कन्वर्ट केले जातात. हे करताना कलर्सचा टोन बदलू शकतो.त्यामुळे मॉनिटर दिसणारे कलर्स प्रिंटिंग मध्ये तसेच येतील असे नाही. तसेच मॉनीटर्स दीर्घ काळापासून वापरत असतील तर त्यांची कार्यक्षमता कमी झालेली असते. जुने मॉनिटर RGB सिग्नल व्यवस्थित प्रदर्शित करू शकत नाहीत. तिसरे आणि सर्वाधिक शक्यता असलेले कारण म्हणजे आपण डोळ्यांना त्रास होऊ नये यासाठी मॉनिटर चा ब्राईटनेस आणि काँट्रास्ट कमी जास्त केला जातो. यामुळे सुद्धा कलर्स अचूक दिसत नाहीत. मोठ्या पब्लिशिंग हाउस मध्ये किंवा प्रोफेशनल जाहिरात एजन्सिजमध्ये  ग्राफिक डिझायनिंग साठी विशेष पद्धतीने कॅलिब्रेट केलेले  मॉनीटर्स वापरले जातात. मॉनिटर कॅलिबेशन साठी विशेष हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर वापरली जातात. काही वेळा डिजिटल प्रिंटिंग प्रेस अथवा ऑफसेट प्रिंटिंग प्रेस सुद्धा  कॅलिब्रेट केल्या नसतील तरीही कलर्स अचूक प्रिंट होत नाहीत. आपल्या समस्येचे नेमके कोणते कारण असावे याचा शोध घेऊन त्यावर उपाय करावा.

...


Corel Draw, Photoshop शिकल्यानंतर मी लगेच माझा स्वताचा व्यवसाय करू शकतो का?


स्वयम् लर्न ने विकसित केलेल्या लर्निंग प्रोग्राम व्दारे आपण प्रोफेशनल क्वालिटीचे ग्राफिक डिझायनिंग पुरेशा सरावानंतर आणि आपली कल्पनाशक्ती वापरून नक्की करू शकाल. परन्तु व्यवसाय करताना ग्राहकाची अपेक्षा असते की आपण ग्राफिक डिझायनिंग ते प्रिंटींग बाईंडिंग सर्व करून संपूर्ण जॉब त्यांना करून द्यावा. यासाठी आपल्याला ग्राफिक डिझाईनिंग नंतर येणाऱ्या पुढच्या टप्प्यांचा सखोल अनुभव घ्यावा लागेल. यात ऑफसेट प्रिंटिंगसाठी कलर सेपरेशन, प्लेट मेकिंग, प्रिंटिंगसाठी योग्य पेपरची निवड करणे, चांगल्या प्रेस मधून ऑफसेट प्रिंटिंग करवून घेणे, कटिंग, क्रिजिंग, बाइंडिंग करून घेणे या प्रक्रियांचा यात समावेश असतो. ही कामे बाजारातील वेगवेगळ्या एजन्सिज करून घ्यावी लागतात. कामाचा हा प्रत्यक्ष अनुभव कोणत्याही इंस्टिट्यूटमध्ये अथवा पुस्तके वाचून मिळणार नाही. जाहिरात एजन्सी, पब्लिशिंग कंपनी किंवा या क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिकाकडे काम करून  हा अनुभव मिळेल. त्यानंतर आपण स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता.  आपल्याला काही विचारायचे आहे का ?

कृपया आपला प्रश्न, शंका विचारा. आम्ही आपणाशी संवाद साधायला उत्सुक आहोत. आम्ही आपल्याशी इमेल अथवा फोन व्दारे संपर्क साधू.

FOLLOW US