best website maker software
Swayamlearn-Adobe-Photoshop-learning-programme

Adobe Photoshop CS6 Basic to Advanced
Marathi Self Learning Programme 

● अनुभवी इंडस्ट्री प्रोफेशनल व्दारा ट्रेनिंग
● 75 व्हिडिओ लेसन्स
● बेसिक से ऍडव्हान्सड् लेवल पर्यंत ट्रेनिंग
● हाय डेफिनिशन व्हिडिओ लेसन्स 
● असाइनमेंट्स आणि प्रोजेक्ट्स समाविष्ट
● कॉम्प्युटर आणि मोबाईल फोन मध्ये पाहा 

अडोबी फोटोशॉपच्या  परिचयापासून ते ऍडव्हान्सड्  लेव्हल च्या इमेज एडिटिंग साठी, इमेज काम्पोजिशन्स तयार करण्यासाठी वापरली जाणारी विविध टूल् त्यांचे कार्य, त्यांचा प्रत्यक्ष उपयोग, त्यासाठीच्या स्मार्ट टिप्स अशी उपयोगी विविध कौशल्ये या प्रोग्राम मधून शिकता येणार आहेत. 


लेसन मध्ये शिकलेल्या भागाचे प्रात्यक्षिक तुम्हाला स्वतःला करून पाहण्यासाठी स्वयम् लर्न प्रोग्राम DVD मध्ये प्रोजेक्ट फाइल्स सुद्धा देण्यात आल्या आहेत. या प्रोग्रॅममध्ये शिकविलेली कौशल्ये आत्मसात केल्यानंतर तुम्ही फोटोग्राफचे बेसिक ते अॅडव्हांस लेव्हलचे एडिटिंग, 


अचूक कलर करेक्शन, रिटचिंग, अल्बम डिझाईनिंग, फोटोचे बॅकग्राउंड बदलणे, वेगवेगळ्या इमेजेस एकत्र करून त्यांचे काम्पोजिशन्स तयार करणे, टेक्स्ट इफेक्टस् देणे अशी विविध कामे सहजपणे करू शकता. 


डिजिटल मेकअप, वेडिंग अल्बम डिझायनिंग, फ्लेक्स बोर्ड / होर्डिंग डिझायनिंग, बेव ग्राफिक्स डिझायनिंग अशी व्यावसायिक कौशल्ये या प्रोग्राम मधून आपण घरच्या घरी, सोयीच्या वेळेत अत्यल्प किमतीत मराठी मध्ये शिकून डिझाईन प्रोफेशनल बनु शकता.

LIST OF LESSONS

Download first 15 lessons for free

026 Rulers Guides Grids

027 Advertise design-1

028 Lasso Selection

029 Magnetic Lasso

030 Delete Background

031 Transform layers

032 Modify Selection

033 Replace colour

034 Content Aware

035 Magic Wand

036 Quick Selection

037 Advanced Background Rremove

038 Background Eraser

039 Complex Background Remove

040 Image Blending

041 3D Film Strip

042 Layer Mask

043 Jewelery Highlight

044 3D Pop Out

045 Cliping Mask

046 Quick Mask

047 Gradient

048 Text

049 Text on path

050 Text effects

051 Masking text

052 Shapes

053 Smart filters

054 Blur filters

055 Sharpen filters

056 Caricature

057 Layer effects

058 Advertise design-2

059 Black and white to colour

060 Digital makeup

061 Action recording

062 Action apply

063 Karizma album designing essentials

064 Karizma album with cliping mask

065 Karizma Album Cover Page Designing

066 Karizma Album DM Page designing

067 Karizma Album Inner Pages

068 Photo frames

069 Custom shape frames

070 Photo border effects

071 Hoarding design

072 Coloured Mosaic

073 Web animation

074 Glossy button

075 Web banner

Download Now

Adobe Photoshop CS6 Basic to Advanced
Marathi Self Learning Programme 

Rs. 1090

Single user / 2 Year's licence
For Windows PC + Android mobile phone / tab

प्रथम फ्री डाऊनलोड करा, अॅक्टिवेशन करताना ऑनलाइन पेमेंट करा
त्वरित शिकायला सुरु करा 

डाउनलोड साइझ: 718 MB
एकसरसाइज फाइल्स: 95 MB

 DOWNLOAD ORDER NOW

Other options for payment

Cash Deposit / Online banking (NEFT/ IMPS)

Name of bank: Bank of India
Branch: Kothrud, Gujrat Colony, Pune
Name of account : Digital Canvas 
Account no: 052320100000577
Account type: Current Account
IFSC: BKID0000523

Pay by BHIM / UPI

UPI ID: swayamlearn@upi

FAQs

Adobe Photoshop 7 या व्हर्जन मध्ये काही जण अजूनही काम करतात त्यात आणि  Adobe Photoshop CS6 यामध्ये काय फरक आहे? 


Adobe Systems ने  2002 साली अडोबी फोटोशॉप 7 ही व्हर्जन बाजारात आणली. त्यानंतर 2003 त्यांनी Adobe Photoshop CS ही नवीन सीरिज लॉन्च केली (CS अर्थात Creative Suite) या सिरीज मध्ये CS, CS2, CS3, CS4, CS5 आणि  2013 /2014 मध्ये  CS6 ही सुधारित आवृत्ती बाजारात आणली. Adobe Photoshop 7 ही खूप जुनी म्हणजेच 15 वर्षांपूर्वी त्यावेळच्या गरजा आणि तंत्रज्ञान लक्षात घेऊन तयार केलेली आवृत्ती आहे. मागील पंधरा वर्षात डिजिटल कॅमेरा आणि कॉम्प्युटर तंत्रज्ञान खूप  प्रगत झाले आहे. पंधरा वर्षांपूर्वीचा मोबाइल फोन, DSLR कॅमेरा किंवा कॉम्प्युटर ज्याप्रमाणे आज कालबाह्य मानले जातात त्याच प्रमाणे पंधरा वर्षांपूर्वी विकसित केलेले सॉफ्टवेअर आजच्या तंत्रज्ञानाशी सुसंगत नाही आणि आजच्या गरजाही ते भागवू शकत नाही. याचा विपरीत परिणाम जुन्या व्हर्जन मध्ये केलेल्या कामावर स्पष्ट दिसू शकतो. म्हणून 15 वर्षांपूर्वी विकसित केलेले सॉफ्टवेअर आज वापरण्यात नुकसानच आहे.

...


मी एक फोटोग्राफर आहे. वेडिंग अल्बम डिझायनिंग करण्यासाठी मी फोटोशॉप मधील कोणती टूल्स शिकू?


वेडिंग अल्बम डिझायनिंग करण्यासाठी आपल्याला संपूर्ण फोटोशॉप शिकावे लागेल. वेडिंग अल्बम डिझायनिंग करण्यासाठी मल्टीपल लेयर्स, मास्किंग, कलर करेक्शन टूल्स, ब्लेंडिंग मोड्स, फिल्टर्स, टेक्स्ट यासारखी अनेक फीचर्स वापरावी लागतात. इमेजचे बॅकग्राउंड काढण्यासाठी विविध सिलेक्शन टूल्स वापरावी लागतात. फोटोशॉपच्या नजरेतून पाहिल्यास वेडिंग अल्बम डिझाईन करणे आणि फोटोशॉपमध्ये जाहिराती, वेब ग्राफिक्स अथवा  ग्रीटिंग कार्ड डिझाईन करणे यात तांत्रिकदृष्ट्या काहीही फरक नाही. ही सर्व फोटोशॉप इमेज कम्पोजीशन ची उदाहरणे आहेत. यामुळे फोटोशॉप मध्ये आपल्याला वेडिंग अल्बम डिझाईन करायचे असतील किंवा कमर्शिअल ग्राफिक्स डिझाईन, आपल्याला संपूर्ण फोटोशॉप शिकावे लागेल.

... 


मला ग्राफिक डिझायनिंग, लोगो डिझायनिंग, ब्रोशर डिझायनिंग शिकायचे आहे. फोटोशॉप मध्ये ही सर्व कामे करता येतात का?


Adobe Photoshop हे इमेज एडिटिंग आणि कंपोजिटिंग सॉफ्टवेअर आहे. यामध्ये मुख्यतः कॅमेरा ने घेतलेल्या फोटोज आणि डिजिटल इमेजेस वर काम केले जाते.  ग्राफिक डिझायनिंग, लोगो डिझायनिंग, ब्रोशर डिझायनिंग ही कामे करण्यासाठी भारतात Corel Draw चा सर्वाधिक वापर केला जातो. कोरल ड्रॉ हे व्हेक्टर डिझायनिंगचे सॉफ्टवेअर आहे. कमर्शिअल प्रिंटिंगसाठी  तयार केलेलं जाणारे ग्राफिक्स, कमर्शिअल डिझाईन्स, ब्रोशर्स, मासिके, जाहिराती यांचे डिझाईनिंग कोरल ड्रॉ मध्ये केले जाते. स्वयम् लर्न कोरल ड्रा बेसिक ते ऍडव्हान्सड् या लर्निंग प्रोग्राम मध्ये  आपल्याला हे सर्व शिकता येईल. जाहिराती, ब्रोशर्स, मासिके यांच्या डिझाईनिंग मध्ये इमेजेस , फोटोज यांचाही मोठा वापर केला जातो. या इमेजेस एडिट करण्यासाठी मुख्यतः Photoshop चा वापर केला जातो. यामुळे कमर्शिअल ग्राफिक डिझायनरला कमीतकमी फोटोशॉप आणि  कोरल ड्रॉ यांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. नंतर आपण कोरल ड्रॉ ला समकक्ष असलेले Adobe Illustrator आणि  पेज लेआउट, डीटीपी यासाठी Adobe Indesign शिकू शकता.

...


व्यावसायिक फोटोग्राफी साठी मी Canon घेऊ की  Nikon DSLR  घेऊ?


फोटोग्राफी विश्वात वारंवार विचारला जाणारा हा प्रश्न आहे. व्यावसायिक किंवा हौशी फोटोग्राफी करण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यातील नक्की कोणता कॅमेरा खरेदी करायच्या हे आपली आवश्यकता, बजेट, आपण कोणत्या परिस्थिति मध्ये काम करणार आहात तसेच कॅमेरा कंपनीची आफ्टर सेल सर्व्हिस कुठे आणि कशी मिळेल या बाबींवर आपला निर्णय अवलंबून असायला हवा. Canon, Nikon, Sony या जागतिक कंपन्या आहेत.  खरे म्हणजे यापैकी कोणताही कॅमेरा आपण घेतला तरी आपण संतुष्टच व्हाल. कॅमेरा खरेदी करताना कोणत्या बाबीचा विचार व्हायला हवा याची तपशीलवार चर्चा करणारा एक लेख स्वयम् लर्न ब्लॉग वर उपलब्ध आहे. आपल्या प्रश्नाचे उत्तर यात नक्की सापडेल अशी अपेक्षा आहे.

...


मी सेल्स / मार्केटिंग एक्जीक्यूटिव आहे. Photoshop शिकून मला काय उपयोग होईल?


आपण फोटोग्राफी किंवा डिझायनिंग क्षेत्रात काम करीत नसाल तरी आपली सेल्स / मार्केटिंग प्रेझेन्टेशन्स आकर्षक बनविण्यासाठी आपल्याला फोटोशॉप तसेच कोरल ड्रॉ वापरता येतील. तसेच  आपली उत्पादने आणि सेवा यांचे ब्लॉग, फेसबुक, व्हॉटस् अप सारख्या माध्यमांवर वर आकर्षक प्रमोशन करण्यासाठीही याचा चांगला उपयोग होऊ शकतो. मुख्य म्हणजे या सेवांसाठी आपल्याला कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही. यामुळे वेळ आणि पैसे यांची बचतच होईल.

...


Adobe Lighroom आणि Adobe Photoshop यात काय फरक आहे ?


Adobe Lightroom हे प्रोफेशनल इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे. विशेषतः फोटोग्राफर्स साठीच ते विकसित केले गेले आहे. यात  RAW इमेज प्रोसेसिंग, कलर करेक्शन, टोन बॅलन्स अशी कामे केली जातात. याची तुलना आपण जुन्या काळातील फोटो प्रोसेसिंग डार्करूमशी करू शकतो. फोटोग्राफी नंतर क्विक प्रोसेसिंग करण्यासाठी Lightroom चा उपयोग केला जातो. तर Adobe Photoshop हे सम्पूर्ण इमेज एडिटिंग आणि कंपोजिटिंग सॉफ्टवेअर आहे. साधारणपणे  Lightroom मध्ये जी कामे केली जातात ती फोटोशॉप मध्ये पण केली जाऊ शकतात. शिवाय मल्टी लेयर इमेज कंपोजिटिंग हे फोटोशॉप चे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. Adobe Lightroom फक्त फोटोग्राफर्स वापरतात तर Adobe Photoshop चा वापर photography, wedding album designing, graphics designing, web designing, print media, video post production, animaton, E-learning अशा कितीतरी क्षेत्रांमध्ये केला जातो. 

...


Adobe Photoshop CS6 वापरण्यासाठी कॉम्प्युटरची क्षमता काय असावी ?


Adobe व्दारा केलेल्या शिफारिसी नुसार किमान पेंटियम 4 प्रोसेसर आणि 1 GB RAM असलेला कॉम्प्युटर आवश्यक आहे. तथापि DSLR कॅमेरा ने घेतलेल्या 18, 20 मेगापिक्सल साइजच्या  इमेजेस  Adobe Photoshop CS6 में एडिट करायच्या असतील तर किमान  Intel  i3 प्रोसेसर आणि  4 GB RAM आवश्यक आहे. जर तुम्ही  36 बाय 12 इंच आकाराचे वेडिंग अल्बम्स 300 PPI रेजोल्यूशन सह डिझाईन करणार असाल तर कॉम्प्युटर आणखी शक्तिशाली लागेल. किमान Intel i5 प्रोसेसर आणि  8 GB RAM यासाठी आवश्यक आहे. सोबत 2 GB मेमरी असलेले  NVidia ग्राफिक्स कार्ड वापरल्यास कॉम्प्युटर आणखी शक्तिशाली होईल. कॉम्पुटर चा ग्राफिक्स परफॉर्ममन्स आणखी वाढेल तसेच यामुळे प्रोसेसर आणि  RAM यावरील ग्राफिक्स प्रोसेस करण्याचा अतिरिक्त भार कमी होईल आणि त्यांची पूर्ण क्षमता इमेज एडिट करण्यासाठी उपलब्ध होइल.
आपल्याला काही विचारायचे आहे का ?

कृपया आपला प्रश्न, शंका विचारा. आम्ही आपणाशी संवाद साधायला उत्सुक आहोत. आम्ही आपल्याशी इमेल अथवा फोन व्दारे संपर्क साधू.

FOLLOW US